बिहारमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांची साथ सोडली आहे. ते पुन्हा एकदा एनडीए मध्ये परत आले आहेत. भाजपच्या पाठिंब्याने त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.त्यातच आता ईडी तेजस्वी यादव यांची चौकशी करणार आहे. आज जमिनीच्या बदल्यात नोकरी या घोटाळ्याप्रकरणी आरजेडी नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. पाटणा कार्यालयामध्ये ही चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
केंद्रीय तपास यंत्रणांनी १९ जानेवारी रोजी तेजस्वी यादव यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. याआधी आरजेडीचे प्रमुख आणि तेजस्वी यादव यांचे वडील लालू प्रसाद यादव यांच्या देखील ईडीने पाटणा येथील कार्यालयात सुमारे १० तास चौकशी केली होती. आज ईडी तेजस्वी यादव यांची चौकशी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.
मीशा भारती त्यांची मुलगी आणि या प्रकरणातील सहआरोपी नेत्यांसह कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिल्या होत्या. दरम्यान, यावेळी ईडी कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने आरजेडी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने देखील केली. जमिनीच्या बदल्यात नोकरी हा घोटाळा २००२४ ते २००९ या काळातील आहे. याकाळात लालूं प्रसाद यादव हे सरकारमध्ये रेल्वेमंत्री पदावर कार्यरत होते.
२००४ ते २००९ या काळात भारतीय रेल्वेच्या विविध विभागांमध्ये ग्रुप ”डी” पदांवर अनेकांची नियुक्ती करण्यात अली होती. या बदल्यात या लोकांनी लाच स्वरूपात आपली जमीन रेल्वेमंत्र्यांच्या परिवारातील सदस्य आणि संबंधित कंपनीला हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. ज्या कंपनीचे नाव ए. के. इन्फोसिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड असे आहे.