झारखंडमधील जमिन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे सध्या ईडीच्या रडारवर आहेत. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी सोरेन यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्यांना ईडीकडून कधीही अटक होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या सोरेन हे बेपत्ता आहेत. मुख्यमंत्री कुठे गेले आहेत ते प्रोटोकॉल विभागाला देखील माहिती नाहीये. ईडीचे अधिकारी त्यांची वाट बघत आहेत. मात्र सोरेन बेपत्ता असल्याने भाजपाने याचा जोरदार समाचार घेतला आहे. झारखंड भाजपाचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी यांनी हेमंत सोरेन यांच्यावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी एक्स वर ‘बेपत्ता’ असे सोरेन यांचे पोस्टर शेअर केले आहे. तसेच सोरेन यांची माहिती देण्यार्याला ११ हजार रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले आहे.
ईडीने सोमवारी दिल्लीमधील सोरेन यांच्या अधिकृत निवासस्थानाची झडती घेतली. झारखंड भाजपाचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी यांनी एक्स वे एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणाले, ”झारखंडमधील जनतेने मुख्यमंत्र्यांचा शोध घ्यावा. आमच्या राज्याचे मुख्यमंत्री केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीने गेल्या ४० तासांपासून त्यांचा काहीही शोध लागत नाहीये. ईडीचे भीतीने ते गायब झाले आहेत. जो कोणी आमच्या ”आश्वासक मुख्यमंत्र्यांना शोधून कोणताही विलंब न लावता सुखरूप परत आणेल त्याला मी अकरा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल.”
ईडीने या प्रकरणामध्ये पहिल्यांदा २० जानेवारी रोजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा जबाब नोंदवला होता. त्यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे सात त्यांचा जबाब नोंदवला. हा जबाब मनी लॉन्ड्रींग प्रतिबंधक कायद्यांअंतर्गत नोंदवण्यात आला आहे. त्या दिवशी चौकशी पूर्ण झाले नसल्याने आज ईडीने पुन्हा एकदा त्यांना समन्स पाठवले आहे. झारखंड मध्ये सध्या झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार आहेत. या पक्षाचे अध्यक्ष असलेले हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री आहेत. सोरेन यांनी झारखंडमधील सरकार अस्थिर करण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर केंद्रातील भाजपा सरकारने केला असल्याचा आरोप केला आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, तपास यंत्रणांनी राज्यातील कथित बेकायदेशीर खाणकामाच्या मनी लॉन्ड्रींगच्या चौकशीचा भाग म्हणून सोरेन यांचे माध्यम सल्लागार, साहिबगंज जिल्ह्यातील अधिकारी आणि माजी आमदार यांच्या जागेवर छापे टाकले होते.ईडी २०२२ पासून राज्यातील बेकायदेशीर खाणकामातून निर्माण झालेल्या १०० कोटी रुपयांच्या गुन्ह्याची चौकशी करत आहे. तपास यंत्रणांनी आतापर्यंत या प्रकरणात १४ लोकांना अटक केली आहे. ज्यामध्ये २०११ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी छवी रंजन यांचा समावेश आहे. रंजन यांनी राज्याच्या समाज कल्याण विभागाचे संचालक आणि रांचीच्या उपयुक्त म्हणून काम केले होते.