केरळमधील भाजपाचे ओबीसी मोर्चाचे राज्य सचिब रंजित श्रीनिवासन यांच्यावर १९ डिसेंबर २०२१ मध्ये हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांच्या कुटुंबासमोर त्यांच्यावर क्रूर हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपा नेते रंजित श्रीनिवासन यांच्या २०२१ मध्ये झालेल्या हत्येप्रकरणी मावेलिक्कारा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. शिक्षेचे प्रमाण न्यायालय नंतर ठरवणार आहे.
या आधी २० जानेवारीला या प्रकरणातील आरोपी असलेल्या १५ जणांपैकी ८ जण या प्रकरणात थेट सहभागी होते असे न्यायालयाला आढळून आले. न्यायालयाने इतर चार जणांना हत्येसाठी दोषी ठरवले. तर उर्वरित हे हत्या करण्याच्या ठिकाणी प्राणघातक शस्त्रे घेऊन घटनास्थळी आले होते. न्यायालयाने शिक्षा सुनावलेले सर्व आरोपी हे बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटने (PFI) चे सदस्य होते. रंजित श्रीनिवासन यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या तीन गुन्हेगारी कट आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. तर सर्व १५ आरोपींवरील खुनाचे आरोप सिद्ध झाले. पीआयएफ संघटेनवर २०२२ मध्ये बंदी घालण्यात आली होती.