आज (1 फेब्रुवारी) अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंतरिम अर्थसंकल्प 2024ला मंजुरी दिली आहे. त्यानंतर अर्थमंत्री सीतारामन संसदेत दाखल झाल्या आहेत.
तसेच आता अंतरिम अर्थसंकल्पाबाबत मंत्रिमंडळात बैठक सुरू आहे. या बैठकीला पंतप्रधना नरेंद्र मोदीही उपस्थित आहेत. तसेच या बैठकीत अर्थसंकल्प मंजूर केला जाईल. अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर 11 वाजता अर्थमंत्री सीतारामन संसदेत बजेट सादर करतील.
अर्थसंकल्पाच्या प्रती देखील संसद भवनात पोहोचल्या आहेत. या प्रती टेम्पोमधून बाहेर काढण्यात आल्या.
दरम्यान, काही महिन्यांनी देशात लोकसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे आज अर्थमंत्री मिनी बजेट सादर करणार आहेत. तसेच आता या मिनी बजेटकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत.