आज (1 फेब्रुवारी) अर्थमंत्री निर्मला सीतारामण देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. काही महिन्यांनी देशात लोकसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे आज अर्थमंत्री मिनी बजेट सादर करणार आहेत. तसेच आता या मिनी बजेटकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत.
तसेच हे बजेट सादर करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अंतरिम बजेट हे देशासाठी चांगले असेल”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी कॅबिनेट बैठकीत दिली आहे.