अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या काळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी योजनांची माहिती, तसेच गेल्या पाच वर्षांमधील अर्थव्यवस्थेमध्ये झालेले बदल यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी लखपती दीदींबद्दल देखील माहिती दिली. यंदा लोकसभा निवडणूक होणार असल्याने अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. तसेच जुलैमध्ये नवीन आणि पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार सांगितले. देशभरात आणखी १५ एम्स रुग्णालये उभारणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण म्हणाल्या, लखपती दीदींना बढती दिली जाणार आहे. पगार दोन कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढवण्यात आला आहे. यामुळे ९ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झाला आहे. लखपती दीदींकडून स्वावलंबन आले आहे. अंगणवाडी कार्यक्रमांना गती दिली जाईल. आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्यात आले आहे.
अर्थसंकल्पातील इतर महत्वाचे मुद्दे –
अलीकडच्या काळामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक बदल झाले आहेत. 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा देशासमोर अनेक आव्हाने होती. अर्थव्यवस्था मजबुत होण्यासाठी व त्यामुळे लोकांना रोजगार मिळण्यासाठी अनेक योजना आणि कार्यक्रम हाती घेण्यात आले. सर्वांचा विकास हेच सरकारचे ध्येय आहे, असेही निर्मला सितारमण म्हणाल्या.
२०४७ पर्यंत भारत विकसित देश होणार
अलीकडच्या काळामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक बदल झाले आहेत. २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा देशासमोर अनेक आव्हाने होती. अर्थव्यवस्था मजबुकत होण्यासाठी व त्यामुळे लोकांना रोजगार मिळण्यासाठी यासाठी अनेक योजना आणि कार्यक्रम हाती घेण्यात आले. सर्वांचा विकास हेच सरकारचे ध्येय आहे. २०४७ पर्यंत आपण भारताला विकसित देश बनवू.
ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढ
गेल्या दहा वर्षांमध्ये सरकारने प्रत्येक घरामध्ये वीज, पाणी, गॅस या सेवा पुरविण्याचे काम केले आहे. तसेच वित्तीय सेवा आणि बँकेत खाती उघडण्याच काम देखील केलं आहे. ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले आहे. मूलभूत गरज पूर्ण झाल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढण्यास मदत झाली आहे. तसेच आम्ही भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपविली आहे.
गेल्या १० वर्षांत सकारात्मक विका
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण या संसदेमध्ये मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प मांडत आहेत. लवकरच लोकसभा निवडणूक होणार असल्याने हा अर्थसंकल्प अंतरिम असणार आहे. दरम्यान, अर्थसंकल्प मांडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळात सकारात्मक विकास झाल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या आहेत.
२५ कोटी नागरिक आले गरिबीतून बाहेर
आतापर्यंत २५ कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश आल्याचे केन्द्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. सरकार हे सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या त्रिसूत्रीवर काम करत आहे. गरीब, महिला, तरुण यांच्या सक्षमीकरणावर भर देत आहे. पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत ४ कोटी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळाला आहे.
आशा आणि अंगणवाडी सेविकांना मिळणार ‘हा’ लाभ
अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारमण या देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आता आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांना देखील आयुषमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. या बजेटमध्ये अनेक घोषणा करण्यात येत आहेत. यामध्ये महिला, शेतकरी आणि तरुण वर्गासाठी अनेक हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत.