देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या संसदेमध्ये मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प मांडत आहेत. लवकरच लोकसभा निवडणूक होणार असल्याने हा अर्थसंकल्प अंतरिम असणार आहे. दरम्यान, अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
1. सरकारचे सकल विकासाकडे लक्ष आहे. सरकारचा महिला सशक्तीकरणावर भर आहे. मागील 10 वर्षांत महिला उच्च शिक्षण घेत आहेत. तसेच ग्रामीण महिलांना पीएम आवास योजने अंतर्गत 70 टक्के घरे मिळाली आहेत.
2. आत्तापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी या योजनेचा लाभ मिळाला आहे. तसेच आता हा आकडा तीन कोटी रुपयांपर्यंत नेला जाणार आहे.
3. विधानसभेमध्ये महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
4. सर्व्हायकल कँसरबाबत 9 ते 14 वयोगटातील महिलांसाठी मोफत लसीकरण करण्यात येणार आहे.
5. तीन तलाक प्रथेला बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे.
6. सरकारच्या प्रयत्नांमुळ महिलांची उद्योजकता 24 टक्क्यांनी वाढवली आहे,