आज (1 फेब्रुवारी) देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. लवकरच लोकसभा निवडणूक होणार असल्याने हा अर्थसंकल्प अंतरिम असणार आहे. दरम्यान, या अंतरिम अर्थसंकल्पावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हा अर्थसंकल्प अत्यंत वाईट काळात देशाला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प आहे, असे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. तसेच या अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या विरोधकांवरही त्यांनी निशाणा साधला.
अमोल मिटकरी म्हणाले की, आजचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांना न्याय देणार आहे. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने अंगणवाडी महिला, सर्वसामान्य महिला यांच्या हिताचा विचार करून अनेक योजना जाहीर केल्या आहेत.
पुढे ते म्हणाले, विरोधकांना अर्थसंकल्पातले काही समजत नाही. त्यामुळे विरोधकांनी अर्थसंकल्पाचा नीट अभ्यास करावा आणि मग त्यांनी टीका करावी, असेही मिटकरी म्हणाले.