मुंबई महापालिकेचा २०२४-२५ आर्थिक वर्षाचा अंदाजित अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. पालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसली तरी लोकसभेची निवडणूक जवळ आलेली असल्यामुळे त्याचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पावर उमटण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याचप्रमाणे , गेल्या अर्थसंकल्पापेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पात १०.५० टक्क्यांनी वाढ दाखवण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेचा २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा ५९९५४.७५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी आज सादर केला आहे .यामध्ये मुंबईकरांसाठी विविध पायाभूत सुविधा, तसेच विकासकामांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे.
महापालिकेला मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली असली तरी या अर्थसंकल्पात आरोग्य विभाग आणि कोस्टल रोडसाठी भरघोस तरतूद करण्यात आली आहे.मुंबई स्वच्छ, हिरवीगार आणि जगण्यासाठी आकांक्षी ठेवण्यासाठी नागरी सुविधांच्या बळकटीकरणासाठी रु.31774.59 कोटींची सर्वोच्च पायाभूत सुविधेसाठी यात तरतूद करण्यात आली आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे (WEH) आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे (EEH) वर ऍक्सेस कंट्रोल प्रोजेक्ट राबविण्याचा प्रस्ताव यात मांडण्यात आला आहे.
तर इतर खात्यातील तरतुदी खालीलप्रमाणे :
घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी ४८७८.३७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अग्निशमन दलासाठी ६८९.९९ कोटी रुपयांची तरतूद.
रस्ते आणि वाहतूक प्रचालन खात्यासाठी ४३५०.९६ कोटींची तरतूद.
आरोग्य खात्यासाठी १९१५.१२ कोटी रुपयांची तरतूद.
पूल खात्यासाठी ४८५२.०३ कोटी रुपयांची तरतूद.
पाणीपुरवठा प्रकल्प खात्यासाठी २४४८.४३ कोटी रुपयांची तरतूद