उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने मॉस्कोमधील भारतीय दूतावासाच्या कर्मचाऱ्याला पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI ला ‘गोपनीय’ माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे
उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सतेंद्र सिवाल याला एटीएसने भारतविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून अटक केली आहे . मेरठमधून त्याला अटक करण्यात आली आहे. सत्येंद्र सिवाल (Satyendra Siwal) असे या एजंटचे नाव आहे. दुतावासात IBSA पदावर तो कार्यरत होता. परराष्ट्र मंत्रालयाद्वारे त्याला मॉस्कोतील भारतीय दुतावासात नियुक्त करण्यात आले होते.आयएसआय एजंट असलेला सतेंद्र हा मॉस्कोतील भारतीय दुतावासात इंडियन बेस्ड सिक्योरिटी असिस्टेंट (IBSA) या पदावर कार्यरत होता.
गुप्त माहितीच्या आधारे उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने त्याला अटक केली असून सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत आणि पुढील तपास करत आहेत. त्याच्याकडून दोन मोबाईल फोन आणि आधार कार्ड जप्त करण्यात आले आहे.आपल्या गुन्ह्याची त्याने कबुली दिली असून मॉस्कोत कार्यरत असलेला हा कर्मचारी 2021 पासून आयएसआयला माहिती पुरवत होता.
आयएसआय हँडलर म्हणून काम करणाऱ्या सतेंद्र याने भारतीय दूतावास, संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय लष्करी संस्थेची महत्त्वाची गोपनीय माहिती पाठवल्याचा आरोप आहे.आयएसआय कडून हनी ट्रॅप आणि पैशांचे आमिष देऊन ही माहिती मिळवण्यास येत होती.