ग्रॅमी अवॉर्ड्सला संगीत जगतात सर्वोच्च स्थान आहे. यावर्षी हा कार्यक्रम रविवारी लॉस एंजेलिसमधील Crypto.com एरिना येथे आयोजित करण्यात आला आहे. जिथे अनेक गायक-गायिकांना त्यांच्या कलेसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये काही भारतीय संगीतकारांचीही नावे आहेत. ग्रॅमी पुरस्कार 2024 मध्ये भारताचा दबदबा दिसून आला. यावर्षी अनेक भारतीय संगीतकारांनी एकत्र पुरस्कार पटकावले आहेत.
भारतीय गायक शंकर महादेव आणि प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांना ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारताच्या फ्यूजन बँड ‘शक्ती’ने यावर्षी ग्रॅमीमध्ये धमाल केली. बँडच्या ‘दिस मोमेंट’ या अल्बमला ‘बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम’चा पुरस्कार मिळाला आहे. ‘शक्ति’मध्ये शंकर महादेवन, जॉन मॅक्लॉफलिन, झाकीर हुसेन, व्ही सेल्वागणेश आणि गणेश राजगोपालन हे कलाकार आहेत.
झाकीर हुसेन यांना अमेरिकेतील 66 व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कारांच्या प्रीमियर समारंभात ‘पश्तो’ भाषेतील योगदानासाठी सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत कामगिरीचा ग्रॅमी पुरस्कार मिळाला. याशिवाय त्यांला सर्वोत्कृष्ट समकालीन वाद्य अल्बम आणि सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिकचे पुरस्कारही मिळाले. उस्ताद झाकीर हुसैन यांनी राकेश चौरसिया या तेजस्वी बासरीवादकासोबत त्यांचा दुसरा ग्रॅमी जिंकला आहे. आज संपूर्ण देश भारतीय कलाकारांच्या विजयाने आनंदित आहे. सोशल मीडियावर लोक सतत त्यांचे अभिनंदन करत आहेत.
दरम्यान, या वर्षी ग्रॅमी अवॉर्ड जिंकणाऱ्यांमध्ये मायली सायरस, डोजा कॅट, डुआ लिपा, बिली आयलिश, ऑलिव्हिया रॉड्रिगो आणि टेलर स्विफ्ट सारख्या स्टार्सचाही समावेश आहे.