भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बोटाला दुखापत झाल्यामुळे भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल मैदानात उतरणार नाही, अशी घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केली आहे. विशाखापट्टणम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ही माहिती दिली.
बीसीसीआयने X वर पोस्ट करत लिहिले आहे की, “दुसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना शुभमन गिलच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे तो आज क्षेत्ररक्षण करणार नाही.”
तर आता शुभमन गिलच्या जागी सरफराज खान खेळणार आहे. सरफराज खान आजच्या दिवसासाठी गिलच्या जागी खळणार आहे. तसेच शेवटच्या दिवशी शुभमन गिल मैदानात उतरेल की नाही याबाबत अद्याप निश्चित झालेले नाही.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, जिंकण्यासाठी 399 धावांचा पाठलाग करताना, जॅक क्रॉली (29*) आणि रेहान अहमद (9*) नाबाद राहिलेल्या इंग्लंडने तिसरा दिवस 67/1 वर संपलला. तर दुसऱ्या डावात 255 धावांत गुंडाळल्यानंतर भारताने 398 धावांची आघाडी घेतली. शुभमन गिलने 147 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 104 धावांची शानदार खेळी केली आणि 12 डावांनंतर पन्नासहून अधिक धावा केल्या. अक्षर पटेल (84 चेंडूत सहा चौकारांसह 45 धावा), रविचंद्रन अश्विन आणि श्रेयस अय्यर (प्रत्येकी 29 धावा) यांच्या योगदानामुळे भारताला मोठी आघाडी घेता आली.
तर जसप्रीत बुमराहच्या पराक्रमाच्या नेतृत्वाखाली भारताने यापूर्वी इंग्लंडला त्यांच्या पहिल्या डावात अवघ्या 253 धावांत गुंडाळले होते आणि 143 धावांची आघाडी मिळवली होती. झॅक क्रॉलीने 78 चेंडूंत 11 चौकार आणि दोन षटकारांसह 76 धावा करत प्रभावी पलटवार केला, पण बुमराह (6/45) याने फिरकी गोलंदाज कुलदीप यादव (3/71) याच्या साथीने उर्वरित इंग्लिश संघाचा धुव्वा उडवला.
युवा यशस्वी जैस्वालच्या (290 चेंडूंत 209, 19 चौकार आणि सात षटकारांसह) पहिल्या द्विशतकामुळे भारताने पहिल्या डावात 396 धावांपर्यंत मजल मारली. शुभमन गिल (34), रजत पाटीदार (32), श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल (प्रत्येकी 27) यांच्या खेळीने डावखुऱ्या फलंदाजाला काहीशी मदत केली.