दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आता ईडीने अरविंद केजरीवाल यांच्या निकवर्तींयांच्या घरावर छापेमारी केली आहे. केजरीवाल यांचा पीएस वैभव आणि खासदार एनडी गुप्ता यांच्यासह अनेक आप नेत्यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे.
मनी लॉँड्रिंग प्रकरणात ईडीने अरविंद केजरीवाल यांचे पीएस वैभव आणि खासदार एनडी गुप्ता यांच्या घरावर छापे टाकले आहेत. ईडी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. एएनआय वृतसंस्थेने ट्वीट करत माहिती दिली की, ईडीची आपचे खासदार एनडी गुप्ता यांच्या दिल्लीतील घरावर छापेमारी सुरू आहे.
तसेच मिळालेल्या माहितीनुसार, मनी लाँड्रींगच्या चौकशीचा एक भाग म्हणून ईडी आम आदमी पार्टीशी संबंधित असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वैयक्तिक सचिवांच्या निवासस्थानासह सुमारे 10 ठिकाणी छापेमारी करत शोध घेत आहे.