लोकसभा निवडणूकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. जर केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आले तर देशातील जातीनिहाय जनगणना केली जाईल आणि आरक्षणावरील 50 टक्क्यांची मर्यांदा हटवली जाईल, अशी घोषणा राहुल गांधींनी केली आहे. ते रांची येथील शहीद मैदानात झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आयोजित रॅलीला संबोधित करताना बोलत होते.
यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीका केली. राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी म्हणतात की कोणतीही जात अस्तित्वात नाही. पण जेव्हा मते मागायची वेळ येते तेव्हा पंतप्रधान म्हणतात की ते ओबीसी आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणतात की ते ओबीसी आहेत. पण जातीनिहाय जनगणनेची मागणी केली की ते सांगतात की, गरीब आणि श्रीमंत अशा फक्त दोन जाती आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
तसेच X वर राहुल गांधींचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, आजकाल 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण मिळू शकत नाही. पण हे 50 टक्क्यांचे लिमीट काँग्रेस आणि इंडीया आघाडीचे सरकार फेकून देईल.