मध्य प्रदेशमधील हरदा येथील फटाक्यांच्या कारखान्याला मोठी आग लागल्याचे वृत्त हाती येत आहे. लागलेली आग भीषण स्वरूपाची आग आहे. या आगीमध्ये आतापर्यंत सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ४० पेक्षा अधिक लोकं जखमी झाली आहेत. मध्य प्रदेशमध्ये असणाऱ्या हरदा येथील मरगधा येथील ठिकाणी असलेल्या फटाक्यांच्या कारखान्याला ही भीषण आग लागली आहे. आगीचे लोळ हे आजूबाजूला असणाऱ्या ६० पेक्षा जास्त घरांमध्ये पसरले. संपूर्ण परिसरामध्ये १०० पेक्षा जास्त घरे रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
फटाक्यांच्या कारखान्यात झालेला स्फोट हा इतका भीषण होता, की त्यामुळे लागलेली आग जवळपासच्या ६० पेक्षा अधिक घरांमध्ये पसरली. या स्फोटाचा आवाज इतका भयानक होता की, मोठ्या आवाजामुळे नागरिक इकडे तिकडे धावू लागले. या घटनेची माहिती मिळटाच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून, बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.
फटाक्यांच्या कारखान्यात आग लागल्याने आगीने थोड्याच वेळात मोठ्या प्रमाणात पेट घेतला. बचावकार्य सुरु असून, आजूबाजूच्या जिल्ह्यातून रुग्णवाहिका आणि डॉक्टर्स यांची टीम घटनास्थळी बोलाविण्यात आलेली आहे. एनडीआरएफ टीमची देखील मदत घेण्यात येणार आहे. २० ते २५ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.