काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झालेली आपल्याला पाहायला मिळाली. लालूप्रसाद यादव यांची साथ सोडून नितीश कुमार हे पुन्हा एकदा एनडीए मध्ये परत आले. एनडीएसह एकत्रित येऊन त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर बिहारमंध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन झाले. या सर्व घडामोडीनंतर प्रथमच नितीश कुमार यांनी नवीन दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तसेच पुन्हा कधीही एनडीए सोडणार नसल्याचे नितीश कुमार यांनी पुनरुच्चार देखील केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, ”मला पूर्ण विश्वास आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेत्रत्वखाली राज्यातील एनडीए सरकार सतत विकासाच्या नवीन शिखरांना स्पर्श करेल.” तसेच ते पुढे म्हणाले, ”बिहारमध्ये एनडीए आघाडीचे नवीन सरकार स्थापन झाले आहे. जनता ही सर्वस्व आहे आणि त्यांची सेवा करणे हे आमचे मूळ उद्दिष्ट आहे. केंद्र आणि राज्यात एनडीएचे सरकार असल्याने विकासकामांना गती मिळेल.”
पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नितीश कुमारांनी भाजपासोबत असलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. जेडीयू प्रमुख म्हणाले, ”आता आम्ही एनडीए कधीच सोडणार नाही.” पंतप्रधानांच्या भेटीसोबतच नितीश कुमार यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशीही चर्चा केली.
नितीश कुमारांनी भेट घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्स वर एक पोस्ट शेअर केली. त्यात ते म्हणाले, ”त्यांना विश्वास आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ”मार्गदर्शन” आणि मुख्यमंत्र्यांच्या “नेतृत्वाखाली” NDA सरकार “बिहारमध्ये सुशासन आणि विकासाला गती देईल”.