भारत सरकारने म्यानमार संदर्भात एका मोठा निर्णय घेतला आहे. मध्यंतरी म्यानमार सीमेवर कुंपण बांधणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. आता देखील केंद्र सरकाराणे एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. भारत-म्यानमारमधील मुक्त संचारावर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने भारतीय सैन्य दलांना दिले आहेत.
दरम्यान, म्यानमारमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्याचे आल्याचे गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबतची माहिती ‘एक्स’ या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी सांगितले, ”देशाची अंतर्गत सुरक्षा राखण्यासाठी भारत आणि म्यानमारमधील मुक्त संचार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्यानमारमध्ये सध्या हिंसाचाराचे वातावरण आहे. त्यामुळे तेथील नागरिक ईशान्य भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये शेकडो म्यानमारच्या सैनिकांनी भारतात प्रवेश केल्याचे वृत्त समोर आले आहे. अनेक जण अनधिकृतपणे भारतात घुसखोरी करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भारत- म्यानमार दरम्यान असलेल्या सर्व सीमेवर कुंपण घालण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. तसेच अनधिकृतपणे होणाऱ्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार कटिबद्ध असल्याचे देखील अमित शाह यांनी सांगितले.