पुन्हा कधीही एनडीए सोडणार नाही – नितीश कुमार
काही दिवसांसापूर्वी नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांची साथ सोडून एनडीएला जवळ केले. एनडीए बरोबर सत्ता स्थापन करून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर नितीश कुमारांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली आहे. पंतप्रधानांची भेट झाल्यानंतर आता पुन्हा कधीही एनडीए सोडणार नसल्याचे नितीश कुमारांनी स्पष्ट केले आहे. तसेच केंद्रात व राज्यात एनडीए सरकार असल्याने विकासकामांना गती मिळेल असा विश्वास नितीश कुमारांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार एनडीएत आल्याने एनडीएला फायदा तर इंडिया आघाडीला नुकसान होण्याची शक्यता जास्त प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला दिल्याने अजित पवार गट व शरद पवार गट यांच्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाण दोन्ही गट आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार गट राज्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर दावा करण्याची शक्यता आहे. अजित पवार गट पुण्यातील पक्षाच्या कार्यालयावर देखील दावा करण्याची शक्यता आहे. यामुळे दोन्ही गट समोरासमोर येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. या पार्शवभूमीवर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी ही खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे.
देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार- टाइम्स नाऊ नवभारत सर्व्हेचा अंदाज
यंदाच्या निवडणुकीत एनडीएने, भाजपाने अब कि पार ४०० पार ची घोषणा दिली आहे. त्यातच आता टाइम्स नाऊ नवभारतने केलेला एक सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेनुसार, देशात एनडीएला ३६६ जागा तर इंडिया आघाडीला १०४ ते १०६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र सर्व्हेनुसार ४०० लक्ष्य गाठण्यात एनडीए मागे पडताना दिसून येतंय. तसेच या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या महायुतीला ४८ पैकी ३९ जागा तर तर महाविकास आघाडीला ९ जागा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान २०१९ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा विश्वास महायुतीतील नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.
म्यानमारमधील वाढत्या हिंसाचारामुळे भारत सतर्क; घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
सध्या म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात हिंचासराच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रीय गृह मंत्र्यालायाने भारत म्यानमारमधील मुक्त संचार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या सूचना गृह मंत्रालयाने सैन्य दलांना दिल्या आहेत. तसेच संपूर्ण भारत म्यानमार सीमेवर कुंपण घालण्यात येणार असल्याची घोषणा केंद्री गृह मंत्री अमित शाह यांनी आधीच केली आहे. त्यामुळे भारत सरकार म्यानमारमधील हिंसाचाराचा ईशान्य भारतात काही परिणाम होणार नाही याची दक्षता घेताना दिसून येत आहे.