आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, पक्षाच्या सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि आंध्र प्रदेश राज्याला विशेष श्रेणीचा दर्जा देण्याची मागणी केली. पंतप्रधान कार्यालयाने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामधील भेटीबाबत ट्विट देखील केले आहे.
२०१९ च्या निवडणुकीत विशेष श्रेणीच्या दर्जाच्या मुद्द्यावर राज्यात सत्ता स्थापन करणारे जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक बैठक घेतल्या आहेत. तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्याच्या एका दिवसानंतर ही बैठक झाली असून, आगामी निवडणुकांसाठी हे दोन्ही पक्ष आंध्र प्रदेशात हातमिळवणी करू शकतात अशी अटकळ बांधली जात आहे.
आंध्रप्रदेशात काँग्रेसची ताकद वाढल्याने आणि तेलुगू देसम पक्ष (टीडीपी) भाजपसोबत युती करण्याची शक्यता आहे, सूत्रांनी सांगितले की रेड्डी यांनी शेवटचा प्रयत्न करण्यासाठी राष्ट्रीय राजधानीत पंतप्रधानांची भेट घेतली. ”आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी संसदेच्या संकुलात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. तेव्हा आंध्र प्रदेशला विशेष श्रेणीचा दर्जा या प्रमुख मागणीसह प्रलंबित प्रकल्प आणि मागण्यांवर चर्चा केली”, असे सूत्रांनी सांगितले.