सध्या टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पण इंग्लंडविरूद्धच्या या कसोटी मालिकेतून टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली याने माघार घेतली आहे. या मालिकेत विराट कोहली एकही सामना खेळणार नसल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. अशातच आता विराट कोहलीबाबत एका दिग्गज खेळाडूने खळबळजनक वक्तव्य केले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने विराट कोहलीबाबत धक्कादायक वक्तव्य केले आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वास एकच खळबळ उडाली आहे. “एका सामन्यादरम्यान विराट कोहली माझ्यावर थुंकला होता”, असे वक्तव्य डीन एल्गरने केले आहे.
“2025 मधल्या एका सामन्यात मी बॅटिंगसाठी मैदानात आलो होतो. अश्विन आणि जाडेजासोर मी स्वत: बचाव करत होतो, तेवढ्यात विराट कोहली तेथे आला आणि तो माझ्यावर थुंकला. त्यानंतर आमच्यात वाद झाला आणि मी त्याच्या या कृत्याला उत्तर म्हणून शिव्या घातल्या होत्या”, असे डीन एल्गरने सांगितले.
हा वाद झाल्यानंतर विराट कोहलीने माझी माफी मागितली होती. जेव्हा 2017-18 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता तेव्हा विराटने माफी मागितली होती, असा खुलासाही एल्गरने केला आहे.