पुणे 11 फेब्रुवारी : महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. कारण इथं संतांचं सान्निध्य आहे. भक्तीतून मिळणारी शक्तीच शत्रूंचा सामना करण्यासाठी शक्ती देते, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. योगी आदित्यनाथ यांनी आळंदीत सुरू असलेल्या गीता-भक्ती अमृत महोत्सवाला उपस्थिती लावली. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं. शिवरायांनी ज्याप्रमाणे औरंगजेबाला नमवलं त्या शौर्याचा दाखला देत महाराष्ट्राच्या भूमीचंही योगी आदित्यनाथ यांनी कौतुक केले. यावेळी रामदास स्वामींच्या शिवरायांना दिलेल्या संस्कारांचाही त्यांनी दाखला दिला.
यावेळी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन भूमीत लहानपणापासून येण्याची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचादेखील त्यांनी उल्लेख केला. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला मारलं त्यानंतर औरंगजेबाला कोणी विचारलं नसल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्रात एकाच कुटुंबात चार संत होऊन गेले. त्यांचा आशीर्वाद आपल्याला शेकडो वर्षांपासून मिळतो आहे. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांना रामदास स्वामी यांनी घडवलं. त्यांनी औरंगजेबच्या सत्तेला आव्हान दिले. औरंगजेबला असे मारले की आजपर्यंत औरंगजेबला कोणी विचारलं नाही. महाराष्ट्र भूमीत संतांचं सान्निध्य आहे. याच महाराष्ट्रात येऊन आज सगळ्या संतांचं दर्शन मला घेता येत आहे आणि शिवरायाच्या पराक्रमाने पावन झालेली भूमी मला पाहता आल्याचंही योगी आदित्यनाथ म्हणाले.