ब्राझीलमध्ये ICCR संचालित स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्राने साओ पाउलोच्या रस्त्यांवर कार्निव्हलमध्ये भारताची लोकसंस्कृती सादर केली. ICCR प्रशिक्षित ब्राझिलियन नर्तकांनी येथे बिहू आणि गरबा सादर केल्यावर येथील ब्लॉको सेलिब्रेशनचा भाग असलेले बॉलीवूड नृत्य एका वेगळ्या स्तरावर पोहोचले.
10 जानेवारी रोजी साओ पाउलो येथे हजारोंच्या जमावाने यावेळी जल्लोष केला आणि भारताच्या संगीतावर नृत्य केले
राजदूत श्री सुरेश के रेड्डी यांनी ब्लोकोबॉलीवूड या कार्यक्रमाचे उद्घाटन केले, तर विवेकानंद सांस्कृतिक केंद्राच्या संचालक डॉ ज्योती किरण शुक्ला यांनी ICCR संचलित बहुरंगी भारत कार्यक्रमाच्या संकल्पनेचे सादरीकरण केले. सीजी सुश्री मनीषा स्वामी यांनी जमावाला संबोधित केले तर शोभन सक्सेना आणि ब्लोकोबॉलीवूडचे संस्थापक फ्लोरेन्सिया कोसा यांनी कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून भूमिका बजावली.
यानंतर लोक अश्या प्रकारच्या कार्निव्हलमध्ये कोणत्या संस्कृतीचे दर्शन घडले हे लक्षात ठेवतील का याबाबत संदेहता असली तरी बिहू आणि गरबा सारख्या नृत्याच्या माध्यमातून भारतीय संस्कारांची एक झलक या कार्निव्हल मध्ये जगासमोर आली हे मात्र नक्की
जगातील 7 वी मोठी अर्थव्यवस्था समजल्या जाणाऱ्या ब्राझीलमध्ये वेगवेगळ्या संस्कृतीमधून विविधता जपण्याचा प्रयत्न कार्निव्हलच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष केला जातो.