पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून युएई आणि कतारच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. युएई आणि कतारच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी एक्स या सोशल मीडिया अकाउंट एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणाले, ”मी ”भाऊ” युएईच्या अध्यक्षांना मिळण्यासाठी उत्सुक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युएइच्या अध्यक्षांमध्ये चंगले संबंध आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरून सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींची युएई दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात नेतृत्व आणि समुदायातील सदस्यांशी संवाद साधला जाईल आणि अबू धाबीमध्ये BAPS हिंदू मंदिराचे उद्घाटन केले जाणार आहे. ”पंतप्रधान @narendramodi UAE आणि कतार या दोन देशांच्या दौऱ्यावर आहेत. UAE मधील दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात UAE नेतृत्व आणि समुदाय सदस्यांशी संवाद साधला जाणार असून, अबूधाबीमध्ये मंदिराचे उदघाटन आणि दुबई येथे जागतिक परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत.”
युएईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. ज्यांची त्यांनी ९ जानेवारी रोजी ‘व्हायब्रंट गुजरात 2024’ दरम्यान गुजरातमध्ये भेट घेतली होती. ते उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांची देखील भेट घेतील. पंतप्रधान मोदींनी X वर पोस्ट केले. ”माझ्या भावाला @MohamedBinZayed ला भेटण्यासाठी उत्सुक आहे. पुढील दोन दिवसांमध्ये मी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी संयुक्त अमिरात अरब व कतारला भेट देणार आहे. यामुळे या देशांशी भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील.”
मंत्रालयाच्या माहितीनुसार, त्यांच्या द्विपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी आणि UAE चे अध्यक्ष ऊर्जा सुरक्षा, ऊर्जा व्यापार, बंदरे, रेल्वे आणि सागरी लॉजिस्टिक, डिजिटल पायाभूत सुविधा, भांडवल प्रवाह आणि फिनटेक कनेक्टिव्हिटी यासह अनेक आर्थिक क्षेत्रांमध्ये संबंध मजबूत करण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान झाल्यापासून माझी युएईला ही ७ भेट असेल असे मोदींनी सांगितले.