पंजाब-हरियाणा शंभू सीमेवर शेतकऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हरियाणा पोलिस शेतकऱ्यांवर नजर ठेवून आहेत आणि ड्रोनद्वारे त्यांच्या संख्येचा अंदाज घेत आहेत. वेळोवेळी शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. आजूबाजूला धूर झाला असून आंदोलकांनी दगडफेकही केली. त्यानंतर जवानांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
हजारो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन आले आहेत. ड्रोनच्या माध्यमातून पोलिस शेतकऱ्यांवर नजर ठेवून आहेत. तर शेतकऱ्यांना सीमेवरून माघारी धाडण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या जात आहेत.
शंभू सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. यावेळी शेतकरी आणि सैनिक आमनेसामने आले आहेत. तसेच या आंदोलनादरम्यान पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अनेकवेळा अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. अश्रूधुराच्या नळकांड्यांमुळे शेतकरी एकवेळ मागे सरले, मात्र धूर ओसरल्यानंतर शेतकरी लगेच पुढे आले. हजारो शेतकरी सध्या घटनास्थळी आहेत, फतेहगड साहिबहून पाच हजारांहून अधिक ट्रॅक्टर अजूनही मार्गावर आहेत.