सगेसोयरेच्या कायद्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात केली आहे. आज त्यांचा उपोषणाचा सहावा दिवस आहे. तसेच मनोज जरांगेंची प्रकृती आणखी खालावली आहे. त्यांच्या पोटात तीव्र वेदना होत असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
काल मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता. तरीही त्यांनी उपचार घेण्याय नकार दिला होता. तर आज जरांगेंची प्रकृती आणखी खालावली असून त्यांच्या पोटात तीव्र वेदना होत आहेत. अन्न, पाणी, औषधे न घेतल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे.
अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी बोलताना काल मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारला मराठा आरक्षणासाठी धारेवर धरा. मुंबईत मी एकटा जाऊन बसेन.
मला झोपेत सलाईन लावले. पण जरी मी मेलो तरी मला सरकारच्या दारात नेऊन टाका. तसेच मला सलाईन लावायचे असेल तर अगोदर आरक्षणाची अंमलबजावणी कधी करता ते सांगा, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.