मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना काळातील बॉडीबॅग खरेदी कथित घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे.
कथित बॉडी बॅग प्रकरणात किशोरी पेडणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने किशोरी पेडणेकरांवर 22 फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. नियमित कोर्ट कामकाजासाठी उपलब्ध नसल्यामुळे दिलेला अंतरिम दिलासा हायकोर्टाकडून कायम ठेवण्यात आला आहे. तसेच किशारी पेडणेकरांना अटक झाल्यास 30 हजारांच्या जामीनावर तात्काळ सुटका करण्याचे हायकोर्टाचे निर्देश कायम ठेवण्यात आले आहेत.
16 मे ते 7 जून 2020 या कालावधीमध्ये डॉ. हरिदास राठोड यांना किशोरी पेडणेकरांनी व्हिआयपीएलकडून 1200 डेड बॉडी खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 6 हजार 718 रूपयांना विकत घेण्यास भाग पाडल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे. याप्रकरणी पेडणेकरांविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.