गेले काही दिवस कांदा उत्पादक शेतकरी हे केंद्र सरकारकाच्या विरोधात आंदोलन करत होते. मात्र आता केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवली आहे. सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. मात्र यामध्ये सरकारने कांदा निर्यातीवर मर्यादा घातली आहे. ३ लाख टन मेट्रिक कांदा निर्यात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुजरात आणि महाराष्ट्र राज्यात कांद्याचा मुबलक साठा असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना कांदा शेतकऱ्यांच्या स्थितीबद्दल माहिती दिली आहे. त्यानंतर झालेल्या बैठकीत कांदा निर्यातीवरील बंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जगात भारत हा कांदा निर्यात करणाऱ्या देशांमध्ये असणारा एक मोठा देश आहे. देशांतर्गत कांदा स्वस्त मिळावा यासाठी कांदा नरियात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा देखील निर्णय घेण्यात आला होता. निर्यात बंदी घातल्याने राज्यासह देशातील अनेक राज्यातील कांद्याच्या किंमती आटोक्यात आल्या. दरम्यान घाऊक बाजारात कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या किंमती स्वस्त झाल्या. त्यामुळे आता कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यात आली आहे.