पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तरप्रदेशात संभल जिल्ह्यात कल्की धाम पायाभरणी समारंभाच्या पूजेच्या विधीत भाग घेताना दिसून आले. यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि श्री कल्की धाम निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष आचार्य प्रमोद कृष्णम हेही उपस्थित होते. तसेच आज कल्की धाममध्ये अनेक संत, धर्मगुरू आणि इतर नामवंत लोक सहभागी झालेले दिसून आले.
. या मंदिराचे पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम आहेत, हे मंदिर श्री कल्की धाम निर्माण ट्रस्टद्वारे बांधले जात आहे. अध्यक्ष आचार्य प्रमोद कृष्णम यांनी 1 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि त्यांना मंदिराच्या पायाभरणीसाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदींची भेट घेतली म्हणून त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती.
पायाभरणीपूर्वी बोलताना आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले होते की “येथे लाखो भाविक उपस्थित राहतील. हा आपल्या देशासाठी आणि ‘सनातन धर्मा’साठी अभिमानाचा क्षण असणार आहे.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, :आज उत्तर प्रदेशच्या भूमीतून भक्ती आणि अध्यात्माचा आणखी एक प्रवाह वाहू लागला आहे. अनेक चांगली कामे आहेत जी काही लोकांनी फक्त माझ्यासाठी सोडली आहेत आणि मला ती करण्याची अमूल्य संधी या प्रकारे मिळते आहे. . आजचा दिवस खूप प्रेरणादायी आहे. ही प्रेरणा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच मिळते”.
उत्तर प्रदेशातील संबल जिल्ह्यात भगवान विष्णूचा १०वा अवतार असलेल्या कल्कीचे हे मंदिर बांधले जाणार आहे. भगवान कल्की हा भगवान विष्णूचा दहावा अवतार मानला जातो. संबलमध्ये बनवल्या जाणाऱ्या श्री कल्की धामला जगातील सर्वात अनोखे मंदिर म्हटले जात आहे. या मंदिरात भगवान विष्णूच्या 10 अवतारांसाठी 10 वेगवेगळी गर्भगृहे असतील. श्री कल्की धाम मंदिर परिसर पाच एकरात पूर्ण होणार असून त्याला पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे.
ज्या गुलाबी रंगाच्या दगडापासून सोमनाथ मंदिर आणि अयोध्येचे राम मंदिर बनवले गेले आहे त्याच रंगाच्या दगडाने हे मंदिर बांधले जात आहे. तसेच या मंदिरात स्टील किंवा लोखंडाचा वापर केला जाणार नाही. तसेच मंदिराचे शिखर 108 फूट उंच असेल तर मंदिराचा चबुतरा 11 फूट वर बांधला जाणार आहे. येथे 68 तीर्थक्षेत्रे स्थापन करण्यात येणार आहेत. हे मंदिर अंदाजे पाच एकरावर बांधले जाणार असून बांधकामासाठी अंदाजे पाच वर्षे लागतील.
यानंतर, पंतप्रधान मोदी फेब्रुवारी 2023 मध्ये आयोजित UP ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023 (UPGIS 2023) दरम्यान प्राप्त झालेल्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांसाठी आज लखनौमध्ये चौथ्या ग्राउंडब्रेकिंग समारंभात उत्तर प्रदेशमध्ये रु. 10 लाख कोटींहून अधिक किमतीचे तब्बल 14,500 प्रकल्प लॉन्च करतील.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमाला उद्योगपती, सर्वोच्च जागतिक आणि भारतीय कंपन्यांचे प्रतिनिधी, राजदूत आणि उच्चायुक्त आणि इतर प्रतिष्ठित पाहुण्यांसह सुमारे 5,000 सहभागी उपस्थित राहणार आहेत.