गेले दीड ते दोन वर्षे रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. हे युद्ध काही केल्या संपायचे नाव घेताना दिसत नाहीये. त्यातच आता रशियातून एक मोठी बातमी समोर येतेय. अलेक्सी नवाल्नी हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचे कट्टर विरोधक समजले जातात. मात्र आता त्यांच्या मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांचा मृतदेह एका रुग्णालयात आढळून आला आहे. तसेच त्यांच्या शरीरावर जखमा देखील असल्याचे वृत्त समोर आले आहे.
अलेक्सी नवाल्नी यांचा मृतदेह ज्या वेळेस शवागारात आला तेव्हा त्यांच्या शरीरावर आणि डोक्यावर काही जखमा असल्याचे आढळून आले होते. रशियन तुरुंग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ४७ वर्षीय असलेला अलेक्सी नवाल्नी शुक्रवारी आर्कटिकमध्ये पोलर वुल्फ दंड फिरत असताना बेशुद्ध झाला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी अलेक्सी नवाल्नी तीस वर्ष शिक्षा भोगत होता.
व्लादिमीर पुतीन यांच्या कट्टर विरोधकाचा संशयास्पद मृत्यू; नेमके प्रकरण काय?
नियमानुसार, मृतदेह हे मेडिसिन ब्युरोकडे पाठवले जातात मात्र अलेक्सी नवाल्नी याचा मृतदेह हा क्लिनिकल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला होता. मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला तेव्हा त्याच्या शरीरावर आणो डोक्यावर जखमा असल्याचे समोर आले आहे. त्याच्या मृत्यूबाबत काहीतरी लपवले जात आहे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच त्याचा मृतदेह कुटुंबियांना देण्यात आलेला नसल्याची माहिती समोर येत आहे.