भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2024 मध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे, कारण दुखापतीमुळे त्याला शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.
गुजरात टायटन्सच्या एका सूत्राने एएनआयला सांगितले की, “गेल्या वेळी जेव्हा मोहम्मद शमी शस्त्रक्रियेसाठी गेला होता तेव्हा त्याला काही इंजेक्शन्स देण्यात आली होती परंतु त्यांचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे आता त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. असे दिसते आहे की मोहम्मद शमी आयपीएलला मुकणार आहे.”
मोहम्मद शमीने दोन्ही हंगामात गुजरात टायटन्सच्या यशात मोलाचे योगदान दिले आहे. शमीने 2022 मध्ये 20 विकेट्स घेतल्या आणि त्यानंतर आयपीएल 2023 मध्ये 18.64 च्या सरासरीने 28 विकेट घेत त्याने आणखी मजबूत कामगिरी केली.
दरम्यान, गुजरात टायटन्स IPL 2024 मध्ये हार्दिक पांड्याशिवाय खेळणार आहे. हार्दिक पांड्याने 2022 मध्ये संघाला पहिल्या ट्रॉफीपर्यंत नेल्यानंतर फ्रँचायझी सोडली. तसेच आता पांड्याने मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केले असून तो रोहित शर्मानंतर फ्रँचायझीचा कर्णधार बनला आहे.
तर आता स्टार सलामीवीर शुभमन गिल आयपीएल 2024 मध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करणार आहे.