बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता- निर्माता जॅकी भगनानी हे दोघे नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. सध्या या नवदाम्पत्याचे लग्नातले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तसेच चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव देखील केला आहे. अशातच आता या नवदाम्पत्यासाठी अयोध्येवरून खास भेट आली आहे.
रकुल आणि जॅकीला श्रीरामांचा आशिर्वाद मिळाला असून त्या दोघांसाठी अयोध्येवरून खास भेटवस्तू आली आहे. याबाबतची एक पोस्ट रकुलने सोशल मीडियावर शेअक केली आहे.
रकुलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये रकुलने अयोध्येवरून आलेल्या खास भेटवस्तूचा फोटो पोस्ट केला आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरातून रकुल आणि जॅकीला प्रसाद मिळाला आहे.
रकुलने पोस्ट केलेल्या फोटोत एक पेटी दिसत आहेत. त्या पेटीत राम मंदिराची छोटी प्रतिकृती आणि एक चांदीचे नाणे दिसत आहे. तसेच त्यामध्ये प्रसादम म्हणून एक पुस्तकाकृती वस्तू देखील दिसत आहे. तर रकुल आणि जॅकीला त्यांच्या विवाहप्रीत्यर्थ हा खास प्रसाद अयोध्येतून पाठवण्यात आला आहे.
https://www.instagram.com/p/C3t-ZZBv-vB/?utm_source=ig_web_copy_link
अयोध्येवरून आलेल्या या प्रसादाचा फोटो शेअर करत रकुलने म्हटले आहे की, आमच्या विवाहानंतर अयोध्येतून प्रसाद मिळाल्याबद्दल खूप आनंद वाटत आहे. ही आमच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची चांगली सुरूवात आहे. दरम्यान, रकुल आणि जॅकी यांनी 21 फेबुवारी रोजी गोव्यात लग्नगाठ बांधली. त्यांनी शीख आणि सिंधी या दोन्ही रितीरिवाजांनुसार लग्न केले आहे.