न्यूझीलंडचा वनडे आणि टी-20 संघाचा कर्णधार केन विल्यमसन तिसऱ्यांदा बाप झाला आहे. त्याची पत्नी सारा विल्यमसने एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे. केन विल्यमसनने ही गोड बातमी सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना दिली आहे.
यापूर्वी केन विल्यमसनच्या पत्नीने 2019 मध्ये एका मुलीला जन्म दिला होता तर 2022 मध्ये तिने एका मुलाला जन्म दिला होता. तर आज विल्यमसनच्या पत्नीने आणखी एका मुलीला जन्म दिला आहे. विल्यमसनने ही गोड बोतमी सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
केन विल्यमसनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने पत्नी सारा आणि मुलीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “या जगात सुंदर मुलीचे स्वागत आहे.”
https://www.instagram.com/p/C33N05tBjvT/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, सध्या केन विल्यमसन कौटुंबिक सुट्टीवर आहे. तो आपला पूर्ण वेळ पत्नी आणि मुलांसोबत घालवत आहे. तर विल्यमसनआधी भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली हा दुसऱ्यांदा बाप झाला आहे. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने मुलाला जन्म दिला आहे. विराट आणि अनुष्काने त्यांचे मुलाचे नाव ‘अकाय’ ठेवले आहे. तर विरूष्काला एक मुलगी असून तिचे नाव वामिका आहे.