समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना CBI ने नोटीस पाठवली आहे. अवैध उत्खनन प्रकरणी अखिलेश यादव यांना सीबीआयने नोटीस पाठवली असून त्यांना 29 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. त्यामुळे आता अखिलेश यादव हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव हे गुरूवारी सीबीआयच्या चौकशीसाठी हजर राहणार नाहीत. तसेच अखिलेश यादव यांना समन्स बजावण्यावरून समाजवादी पक्ष आक्रमक भूमिका स्वीकारण्याची शक्यता आहे.
अखिलेश यादव हे 2012-13 मध्ये मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडे गौण खनिज खाते होते. त्यावेळी अवैध उत्खननाबाबत गंभीर आरोप झाले होते. तर 2016 मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला होता.
या प्रकरणात माजी मंत्री गायत्री प्रजापती यांचे नाव समोर आले होते. तर या प्रकरणात अखिलेश यादव सरकारमध्ये अनेक जिल्ह्यांच्या डीएम राहिलेल्या बी चंद्रकला यांचेही नाव समोर आले होते आणि त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली होती.