यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमचे अध्यक्ष जॉन चेंबर्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. त्यांनी पीएम मोदी हे जगातील सर्वोत्तम नेते असल्याचे म्हटले आहे. अध्यक्ष जॉन चेंबर्स यांनी सांगितले की, भारतात पंतप्रधान मोदींचे अप्रूव्हल रेटिंग 76 टक्के आहे, याचा अर्थ लोक त्यांना पसंत करतात.
जॉन चेंबर्स म्हणाले की, “मी पीएम मोदींचा खूप मोठा चाहता आहे. मला वाटते की ते जगातील सर्वोत्तम नेते आहेत. अमेरिकेत त्यांच्यासारखे कोणीतरी असावे असे मला वाटते. आमच्याकडे त्यांच्यासारखा एकही असा राजकीय नेता नाही, ज्यांना 50 टक्के मान्यता रेटिंग मिळाले आहे. पण, PM मोदींना 75 टक्के मान्यता रेटिंग मिळाली आहे.
लोकांचा विश्वास संपादन करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या क्षमतेचा दाखला देत, जॉन चेंबर्स यांनी अमेरिकन नेत्यांशी चांगले संबंध निर्माण केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, “तुम्ही एखाद्या नेत्याबद्दल विचार केला तर तो त्याच्या ट्रॅक रेकॉर्डबद्दल आहे. तो त्याच्या नातेसंबंधांबद्दल आणि विश्वासाबद्दल आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी आमच्या सर्व राजकीय नेत्यांसोबत चांगले संबंध निर्माण केले आहेत. त्यामुळे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात”, असे जॉन चेंबर्स म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान मोदी गेल्या वर्षी जूनमध्ये अमेरिकेला गेले होते. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी त्यांना या दौऱ्यासाठी आमंत्रित केले होते. व्हाईट हाऊसमध्ये डिनरपूर्वी पंतप्रधान मोदींनी अमेरिकन खासदारांना संबोधित केले होते. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारत दौऱ्यावर आले होते.