नुकतीच सर्वात शक्तीशाली भारतीयांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे सर्वात शक्तीशाली भारतीय ठरले आहेत. तर ‘सर्वाधिक शक्तीशाली भारतीय 2024’च्या यादीमध्ये राहुल गांधी, अमित शहा, अरविंद केजरीवाल यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या नावांचा समावेश असून ते कितव्या स्थानी आहेत याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
‘सर्वाधिक शक्तीशाली भारतीय 2024’ च्या यादीत पंतप्रधान मोदी हे पहिल्या क्रमांकावर आहेत. तर गृहमंत्री अमित शाह हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष सांगायचे झाल्यास पहिल्या दहा जणांमध्ये जास्तीत जास्त भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते यांच्या नावांचा समावेश आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या 2024 च्या IE 100 यादीत भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नावाचा समावेश आहे. तर या यादीमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे 16व्या स्थानावर आहेत. तसेच आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे 18व्या स्थानी आहेत.
पंतप्रधान मोदी हे देशातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती ठरले असून त्यांचे सध्या X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 9.56 कोटी फॉलोवर्स आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर अमित शाह असून तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे आहेत. तर सरन्यायाधीश चंद्रचूड हे चौथ्या क्रमांकावर आहेत. चंद्रचूड यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये ऐतिहासिक निकाल दिला आहे.
जाणून घ्या टॉप 10 भारतीयांची यादी
1. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2. गृहमंत्री अमित शाह 3. मोहन भागवत 4. डी.वाय.चंद्रचूड 5. एस जयशंकर 6. योगी आदित्यनाथ 7. राजनाथ सिंह 8. निर्मला सीतारमण 9. जे.पी.नड्डा 10. गौतम अदानी