नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी’ या वेब्सिरीजवर बंदी घालण्याची मागणी सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयाकडे केली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे या वेबसीरिजच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सीबीआयने या वेबसीरिजच्या प्रदर्शनास विरोध केला होता. मात्र उच्च न्यायालयाने ही वेबसिरीज पाहिल्यानंतर सीबीआयची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता लवकरच ही वेबसिरीज नेटफ्लिक्स या ओटीटी वर प्रदर्शित होणार आहे.
एखादा व्यक्ती मुख्य आरोपी असताना तो इनोसंट असणे असे दाखवणे, तेही या प्रकरणावर सुनावणी सुरु असताना, असा युक्तिवाद करत सीबीआयकडून न्यायालयात करण्यात आला होता. त्यामुळे प्रदर्शित होण्याआधी ही वेबसिरीज पाहणे आवश्यक असल्याचे सीबीआयचे म्हणणे होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने या वेबसीरिजचे स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आले होते.
या वेब सीरिजचे प्रदर्शन २२ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार होते. पण सीबीआयने हे प्रदर्शन थांबवण्याची याचिका केली होती. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार २९ फेब्रुवारीला या वेबसीरिजचे स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आले होते. मात्र आता उच्च न्यायालायने या वेबसिरीजच प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे लवकरच ही सिरीज आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २४ एप्रिल २०१२ रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणी मुखर्जीच्या ड्रायव्हरला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे इंद्राणीला २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. २०१२ रोजी घडलेले हे सर्व प्रकरण २०१५ मध्ये उघडकीस आले होते.