राज्यातील हवामान गेले काही दिवस सातत्याने बदलायला पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पाऊस, थंडी आणि कडक उन्हाळा असे वातावरण दिसत आहे. मात्र आता हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. आज पहाटेच्या सुमारास पुणे शहरातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा आणि अन्य भागांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पुणे शहरात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. पुणे,लोणी काळभोर, हडपसर आणि पुणे शहरातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, दोन दिन दिवसांमध्ये विजांच्या गडगडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
देशातील वातावरण कसे असेल?
देशातील वातावरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होताना दिसत आहे. काही ठिकाणी कडक उन्हाळा, थंडी तर, काही ठिकाणी पाऊस कोसळत आहे. देशाच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात असलेल्या राज्यांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उत्तर भारतातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. कुठे पाऊस, कुठे गारपीट, कुठे बर्फवृष्टी तर, कुठे कडक उन्हाळा पाहायला मिळतो आहे. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये देशासह राज्यातील वातावरणात बदल होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर भागांमध्ये वादळी वाऱ्यासह, जोरदार गारपीट देखील झाली आहे.
येत्या काही दिवसांमध्ये हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशमध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये दाट धुके पसरण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि ऊत्तराखंडम