केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या चांगल्या कामामुळे कायमच चर्चेत असतात. देशात आधुनिक आणि चांगल्या रस्त्याचे जाळे त्यांनी गेल्या ८ ते ९ वर्षात निर्माण केले आहे. मात्र आता नितीन गडकरी एका वेगळ्या प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस पक्षाला एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे. काँग्रेसने नितीन गडकरी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्याप्रकरणातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस पक्षाला कायदेशीर नोटीस पाठवल्याचे कळते आहे.
काँग्रेसने नितीन गडकरी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र तो व्हिडीओ शेअर करणे काँग्रेसला महागात पडण्याची शक्यता आहे. कारण, या व्हिडीओवरून गडकरींनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि जयराम रमेश यांना नोटीस पाठवली आहे. हा व्हिडीओ लवकरात लवकर हटवून माफी मागावी अशी मागणी या नोटिशीमधून करण्यात आली आहे.
काँग्रेस शेअर केलेला गडकरींचा हा व्हिडीओ अपूर्ण असून, दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे. याबाबत नोटीस पाठवून माफी मागावी असे सांगण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने एक्स वर शेअर केलेला व्हिडीओ खरा नसून, त्यात छेडछाड करण्यात आली आहे. त्यामुळे नितीन गडकरींनी खर्गे आणि जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
काँग्रेसकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये कॅप्शन जाणूनबुजून लपविण्यात आले आहे. या व्हिडिओमधून केंद्रीय मंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. २४ तासांमध्ये हा व्हिडीओ सोशल मीडियावरून काढून टाकावा आणि तीन दिवसांमध्ये माफी मागावी असे नोटिशीमध्ये सांगण्यात आले आहे. अन्यथा आमच्याकडे इतर कायदेशीर पर्याय खुले आहेत असे नोटिशीमधून सांगण्यात आले आहे.