पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दोन दिवसीय राज्य दौऱ्यात पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी, आणि भाजपचे राज्य युनिट प्रमुख सुकांता मजुमदार यांची भेट घेतली.तसेच पश्चिम बंगालमधील संदेशखाली हिंसाचारादरम्यानच्या भाजप कार्यकर्त्यांच्या भूमिकेचे आणि धाडसाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी कौतुक केले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर बंगालचे भाजप नेते सुवेंदू अधिकारी, आणि सुकांत मजुमदार यांच्याशी केलेल्या संभाषणाचा उल्लेख केला आहे. .
पीएम मोदी म्हणाले, “सुवेन्दू अधिकारी आणि सुकांत मजुमदार यांची भेट घेतली. आमचा सुशासनाचा अजेंडा लोकांमध्ये पुढे नेण्याच्या मार्गांवर आम्ही चर्चा केली. मी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे धैर्य,तळमळीचे कौतुक करतो तसेच तृणमूल काँग्रेसच्या कुशासनाविरुद्ध आणि चुकीच्या कारभाराविरुद्ध जोमाने लढा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो.तुम्हीपण त्यांचे कौतुक करा . आम्ही एकत्र येऊन नक्कीच पश्चिम बंगालसाठी चांगले भविष्य निर्माण करू.”
https://x.com/narendramodi/status/1763851584801554495?s=20
पीएम मोदींच्या बंगाल दौऱ्यावर सुकांत मजुमदार म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी बंगालमध्ये सुरू असलेल्या घटनेबद्दल प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर चर्चा केली. ते संदेशाखाली हिंसाचार प्रकरण आणि प्रशासन तसेच राज्य सरकारला आरोपींवर कारवाई करण्यात आलेले अपयश याबद्दलही बोलले.” मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लाज वाटली पाहिजे की गुंड स्वतःच्या अटकेचा दिवस ठरवतो. गुन्हेगाराला पकडण्याचे धाडस पोलिसातही नाही.
दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, PM मोदी यांनी आज पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील कृष्णनगर शहरात 15,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.कृष्णनगरमध्ये त्यांनी रॅलीला संबोधित करून रोड शोही केला.या रोड शो दरम्यान पंतप्रधानांच्या सोबत सुकांता मजुमदार आणि सुवेंदू अधिकारी हे त्यांच्याबरोबर होते.
यानंतर आज दुपारी पंतप्रधान बिहारमध्ये पोचले असून त्यांनी औरंगाबादमध्ये 21,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी 6 मार्चला पुन्हा एकदा बंगालला भेट देणार आहेत. या दिवशी बारासातमध्ये महिलांची भव्य रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.