पुणे पोलिसांनी काही दिवसांनी मोठी कारवाई करत पुण्यामध्ये ४००० कोटींचे ड्रग्स जप्त केले होते. आतापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये ही सर्वात मोठी कारवाई होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणे पोलिसांचे कौतुक केले होते. तसेच पुणे पोलिसांना २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. पुणे पोलिसांनी आता अशीच एक धडक कारवाई केली आहे. पुण्यात काही दिवसांत ड्रग्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्याबाबत पुणे पोलीस देखील धडक कारवाई करत आहेत. पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा जप्त केला आहे.
पुणे पोलिसांनी विश्रांतवाडी येथून ३४० किलोचा ड्रग्ससाठा जप्त केला आहे. विश्रांतवाडी परिसरातून हा साठा जप्त करण्यात आला असून, हे ड्रग्स मेफड्रोन सदृश असल्याचे समजते आहे. आरोपीच्या टेम्पोमधून हा ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला आहे. सध्या पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात अडकलेले पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांत पोलिसांनी ड्रग्सविरुद्धची मोहीम अधिक तीव्र केली आहे. अनेक ठिकाणी छापेमारी केली जात आहे.
पुण्याजवळलेलं पिंपरी चिंचवड येथे देखील पोलिसांनी मेफेड्रोन ड्रग्स जप्त केले आहे. याप्रकरणात एका पोलीस उपनिरीक्षकावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडमधील एका चौकामध्ये दोन कोटींचे ड्रग्स आढळून आले होते. यावरून ड्रग्सच्या विळख्यातून तरुणाईला आणि शहराला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.