प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आज (6 मार्च) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी ‘बेस्ट ऑफ आशा भोसले’ या त्यांच्या पुस्तकाचे उद्घाटन गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते केले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान भाजप अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार देखील उपस्थित होते.
‘बेस्ट ऑफ आशा भोसले’ हे पुस्तक आशा भोसले यांच्या फोटो बायोग्राफीवर आधारित आहे. तर याच पुस्तकाचे प्रकाशन अमित शाह यांच्या हस्ते सह्याद्री अतिथी गृहावर करण्यात आले आहे.
प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी टिपलेल्या आशाताई यांच्या छायाचित्रांचे ‘व्हॅल्युएबल ग्रुप’ आणि आशिष शेलार यांच्या पुढाकाराने ‘बेस्ट ऑफ आशा’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकातून आशा भोसलेंच्या विविध भावमुद्रा आणि त्यांचे गाणे, जीवन उलघडण्यात आले आहे.
‘बेस्ट ऑफ आशा’ या पुस्तकात आशा ताईंची 42 वेगवेगळी छायाचित्रे आणि त्या क्षणांच्या काही आठवणी यांची उत्तमरित्या मांडणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका दस्तऐवजाप्रमाणेच या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.