शाळेतून घरी परतत असताना तृणमूल काँग्रेसच्या बूथ अध्यक्षाच्या मुलासह तीन तरुणांनी नववीच्या वर्गातील मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. घरी सोडतो असे सांगत तरूणीला मोटरसायकलवरून एका शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तृणमूल नेत्याच्या मुलासह 3 जणांना अटक केली आहे.
पोलीस आणि कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीरभूमच्या पायकर थाना हायस्कूलमधील नववीच्या वर्गातील विद्यार्थीनी मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास शाळेतून पायी घरी परतत होती. त्यावेळी तृणमूल बूथ अध्यक्षाच्या मुलासह तीन तरुणांनी विद्यार्थिनीला घरी नेण्याच्या नावाखाली मोटारसायकलवरून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी परिसरातील काही लोक त्या शेतातून घरी परतत होते. त्यावेळी त्यांनी विचित्र आवाज ऐकला आणि झुडपांच्या मागे पाहिले तेव्हा त्यांच्या ही बाब लक्षात आली.
त्यानंतर लोकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पायकर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रथम अल्पवयीन मुलीची सुटका केली. आणि तिला उपचारासाठी पायकोर ब्लॉक रुग्णालयात दाखल केले. नंतर पोलिसांनी अरोपी तरुणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तृणमूलच्या रुद्रनगर क्रमांक 8 नुनपारा बूथ अध्यक्ष सेतारा बीबी यांचा मुलगा राजा शेख याचा समावेश आहे.