सध्या जपान दौऱ्यावर असलेले जयशंकर यांनी भारत-जपान स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपच्या निक्की फोरममध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना युक्रेनच्या चालू संघर्षादरम्यान रशियाबद्दलच्या भारताच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
संभाषणादरम्यान, परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांना विचारण्यात आले की रशिया आणि युक्रेनने केलेल्या प्रादेशिक उल्लंघनावर टीका न करण्याच्या भारताच्या निर्णयाला दुट्टपीपणा म्हणता येईल का यावर जयशंकर म्हणाले, जगात अनेक महत्त्वाची तत्त्वे आणि श्रद्धा आहेत. मात्र जागतिक राजकारणात कधी कधी देशाला आपली भूमिका मांडताना एखादा परिस्थितीनुसार एखादे तत्व स्वीकारावे लागते. आणि त्याभूमिकेवर ठाम राहावे लागते.
मात्र याबाबत भारताने घेतलेली भूमिका रास्त असू शकते कारण भारताने पारतंत्र्य अनुभवले आहे . आक्रमणानंतरचे स्वातंत्र्य अनुभवले आहे.आणि आजही भारताचा काही भाग दुर्दैवाने दुसऱ्या देशाने काही प्रमाणात का होईना पण व्यापलेला आहे.
पुढे ते म्हणाले, “आम्ही अगदी स्पष्टपणे रशियाला याबाबत सांगितले आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि म्हणाले आहेत की, हे युद्धाचे युग नाही याबाबत आम्ही ठाम आहोत तसेच हा संघर्ष संपायला हवा हे मात्र निश्चित आहे.
“आम्हाला या संघर्षाचा शेवट बघायचा आहे, पण आमचा असा विश्वास आहे की प्रत्येक संघर्ष शेवटी जेव्हा काही प्रकारचे लोक समोरासमोर चर्चेला बसतात तेव्हाच संघर्ष संपवता येतो ” असेही जयशंकर म्हणाले आहेत.
युद्धभूमीवर संघर्ष संपवता येईल का याबाबतही परराष्ट्रमंत्र्यांनी जोर दिला, “आम्हाला वाटत नाही की हा संघर्ष युद्धभूमीवर संपू शकेल याला युद्धभूमीच्या बाहेर उपाय शोधणे आवश्यक आहे , असे ते म्हणाले.
दरम्यान, जयशंकर यांनी यापूर्वीही रशियाबाबत भारताच्या भूमिकेचे समर्थन केले होते. याच मुलाखतीत एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याच्या गरजेवर भर दिला.
“आपल्यापैकी बहुतेकांना हे समजले आहे की संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा करण्याची खूप गरज आहे. संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली तेव्हा सुमारे 50 देश सदस्य होते. आज जवळपास 200 देश सदस्य आहेत. त्यामुळे कोणत्याही संघटनेत, जर सदस्यसंख्या चार पटीने वाढली असेल तर त्या संघटनेचे नेतृत्व आणि निर्णयक्षमता सारखीच राहू शकत नाही,” असे ते यावेळी म्हणाले