भारतीय क्रिकेट संघाने काही दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकली आहे. भारताने ४-१ अशा फरकाने कसोटी मालिका जिंकली आहे. भारतीय संघाने इंग्लंड संघाविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये भारतीय क्रिकेट संघ पहिल्या क्रमांकांवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभूत करून व्हाईट वॉश दिला आहे. तरी देखील ऑस्ट्रेलिया संघ पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहोचू शकली नाहीये.
सध्या टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये भारतीय क्रिकेट संघ हा अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर ऑस्ट्रेलिया संघ न्यूझीलंडला हरवून देखील दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. सध्याच्या कसोटी सामन्यांमध्ये भारत एकूण ९ कसोटी सामने खेळला आहे. त्यापैकी ६ सामने टीम इंडिया भारत हरला आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. भारताची विजयाची टक्केवारी ६८.५१ टक्के आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर असून १२ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांनी ८ जिंकले असून, ३ हरले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे.
भारतीय क्रिकेट संघाकडे तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्याची संधी आहे. यापूर्वी भारताने दोन वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळली आहे. २०१९ ते २०२१ मध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध फायनल सामना खेळला होता. मात्र दोन्ही वेळा भारतीय क्रिकेट संघाला अंतिम सामना जिंकण्यात अपयश आले. आता २०२३-२५ मध्ये भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्याची शक्यता आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट्स टेबलमध्ये भारत पहिल्या स्थानी मग ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि बांगलादेश असे संघ आहेत.