गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व दुरूस्ती कायद्याबाबत (CAA) चर्चा सुरू होत्या. अशातच आज (11 मार्च) केंद्रीय गृह मंत्रालय नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबतचे नोटीफिकेशन जारी करणार असल्याची शक्यता आहे. तसेच थोड्या वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधणार आहेत.
10 फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याबाबत मोठी घोषणा केली होती. देशात लोकसभा निवडणुकीपूर्वी सीएए कायदा लागू करणार असल्याचे अमित शाह म्हणाले होते. त्यानंतर आता गृहमंत्रालय अॅक्शन मोडवर आले असून ते आज देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबतचे नोटीफिकेशन जारी करणार असल्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काही आठवड्यांपू्र्वी केंद्रीय गृहमंत्रालयाने CAA कायद्याचे नियम बनवण्यासाठी एक समिती बनवली होती. तर आता CAA चे नियम लागू करण्यासाठी अंतिम प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, जर आम्ही सत्तेत आलो तर सीएए रद्द करू, असे काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले होते. तसेच आसाममध्ये बाहेरच्या देशातून आलेल्यांच्या अधिकृत नागरिकत्वाची तारीख 1971 पर्यंत आहे. पण, मोदी सरकाच्या धोरणामुळे ती 2014 पर्यंत वाढवणार असल्याचे पवन खेडांनी म्हटले होते.