सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. अशातच आता हरियाणामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. लोकसभा निवडणूकीआधीच मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री खट्टर यांच्यासह त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने देखील राजीनामा दिला आहे.
खट्टर यांनी कर्नालमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. तर आता मुख्यमंत्री खट्टर यांनी राजीनामा दिल्यामुळे भाजप आणि जननायक जनता पार्टी (जेजेपी) यांची युती तुटली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांची युती तुटली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटप होऊ शकले नाही. या कारणामुळे युती तुटल्याचे म्हटले जात आहे. तसेच मुख्यमंत्री खट्टर यांच्या कार्यशैलीवर जेजेपीही खूश नसल्याचा दावा केला जात आहे.
मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आज सकाळी 11.30 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती. या बैठकीला भाजप आणि सरकार समर्थित अपक्ष आमदार उपस्थित राहिले आहेत. तर आता भाजप अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करू शकते.
दरम्यान, आज दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या नव्या सरकारमध्ये संजय भाटिया यांना मुख्यमंत्री बनवले जाण्याची शक्यता आहे. तर नायब सैनी यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते. तसेच जेजेपीचे पाच आमदार फुटून भाजपमध्ये सहभागी होणार असल्याचं म्हटलं जातंय.