राजस्थानमधील जैसलमेर येथे प्रशिक्षण चालू असताना भारतीय वायू सेनेच्या तेजस या लढाऊ विमानाला अपघात झाला आहे. युद्धाभास चालू असताना तेजस विमानाला हा अपघात झाल्याचे समजते आहे. विमानाला अपघात झाल्यानंतर पायलटला सुखरूपपणे बाहेर पाडण्यात यश आले आहे. मात्र एका पायलटचा पॅराशूट न उघडल्यामुळे दोघांमधील एक पायलट जखमी झाला आहे.
भारतीय वायू सेनेने प्रशिक्षणार्थी तेजस लढाऊ विमानाच्या अपघातावर एक निवेदन जारी केले आहे. ‘भारतीय वायुसेनेचे एक तेजस विमान जैसलमेरमध्ये आज एका प्रशिक्षणार्थी विमान उड्डाणदरम्यान अपघातग्रस्त झाले आहे. पायलट सुखरूपपणे बाहेर पडले. अपघाताच्या चौकशीसाठी कोर्ट ऑफ एन्क्वायरी गठीत करण्यात आली आहे.’ जैसलमेर शहरात जवाहर कॉलनी जवळ हे विमान कोसळले. दरम्यान यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विमान कोसळल्यानंतर लगेचच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले.