केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केल्यानंतर समोर आलेल्या टीकाकारांना फटकारले आहे आणि असे प्रतिपादन केले की देशात नागरिकता सुधारणा अधिसूचना (Citizenship Amendment Act) लागू झाल्यानंतर अनेक समूदायात संभ्रम आहे, अमित शाह यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. सीएए कायद्यामुळे कुणाचंही नागरिकत्व जाणार नाही, कुणीही घाबरण्याची गरज नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सीएएच्या अनेक पैलूवर चर्चा केली आहे.
अमित शाह म्हणाले की, ‘ओवैसी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यासह सर्व विरोधी पक्ष आता यावर राजकारण करत आहेत. सीएए हा आताच, लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी का लावला असा प्रश्न विचारत आहेत. पण भाजपने 2019 मध्ये आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते की ते CAA कायदा लागू केला जाईल, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील निर्वासितांना नागरिकत्व देण्यात येईल.भाजप जे बोलतो ते करतो. मोदी जे बोलतात ते काळ्या दगडावरची रेष असते , त्याप्रमाणे हा कायदा लागू करण्यात आला आहे.
भारतीय जनता पक्षासाठी हा राजकीय मुद्दा नाही. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानमधील पीडित लोकांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विरोधकांना काही काम नाही त्यामुळे ते शंका उपस्थित करत असतात. असे म्हणत शहांनी विरोधकांना फटकारले आहे.
देशातील अल्पसंख्याक किंवा इतरांना घाबरण्याचे कारण नाही. कारण, सीएएमध्ये लोकांचे नागरिकत्व जाणार नाही. तीन देशातील सहा धर्माच्या लोकांना न्याय देण्याचे आम्ही काम करत आहोत. CAA केवळ अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन आणि पारशी निर्वासितांना हक्क आणि नागरिकत्व देण्यासाठी आहे.असे शाह म्हणाले आहेत .
नरेंद्र मोदी सरकारने सादर केलेल्या आणि 2019 मध्ये संसदेने पारित केलेल्या CAA नियमांचे उद्दिष्ट बांगलादेशातून स्थलांतरित झालेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसह छळ झालेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व प्रदान करणे आहे. ज्यामध्ये पाकिस्तान, आणि अफगाणिस्तान आणि 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या स्थलांतरितांचा समावेश असल्याचे असे शहानी स्पष्ट केले आहे.