आज (14 मार्च) आम आदमी पक्षाने पंजाबमधील लोकसभेच्या जागांसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. या उमेदवारांमध्ये पाच मंत्र्यांचा समावेश आहे. याशिवाय विद्यमान खासदार सुशील रिंकू यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
पक्षाने अमृतसरमधून कुलदीप सिंग धालीवाल, खादूर साहिबमधून लालजीत सिंग भुल्लर, फरीदकोटमधून कर्मजीत अनमोल, भटिंडामधून गुरमीत सिंग खुदियान, पटियालामधून डॉ. बलबीर सिंग आणि संगरूरमधून गुरमीत सिंग मीत हैर यांना उमेदवारी दिली आहे. तर जालंधरमधून विद्यमान खासदार सुशील रिंकू यांनाही तिकीट देण्यात आले आहे. तर काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून आम आदमी पक्षात दाखल झालेले गुरप्रीत सिंग जीपी यांना फतेहगढ साहिबमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
फतेहगढ साहिबमधून रिंगणात उतरलेले गुरप्रीत जीपी यांनी पाच दिवसांपूर्वी काँग्रेस सोडून ‘आप’मध्ये प्रवेश केला होता. आपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पंजाब काँग्रेसमध्ये अनुशासनाचा आरोप केला होता आणि काँग्रेसमध्ये घराणेशाही असल्याचे म्हटले होते. प्रत्येक नेता आपल्या कुटुंबाचा विचार करतो. मात्र आम आदमी पार्टी हा सर्वसामान्यांच्या प्रतिनिधींचा पक्ष आहे, त्यामुळे आपण ‘आप’मध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे गुरप्रीत जीपी यांनी सांगितले.
दरम्यान, ‘आप’ने पंजाबमधील 13 लोकसभा जागांपैकी गुरुदासपूर, होशियारपूर, आनंदपूर साहिब, लुधियाना आणि फिरोजपूरमधील उमेदवारांची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत.
Tags: aam adami partyAAPaap candidates list for punjabarvind kejriwal