लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण भारताच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आणि भाजपचे लक्ष दक्षिणेतील लोकसभेच्या सुमारे 129 जागांवर आहे. याच पार्श्वभूमीवर पीएम मोदी आज तामिळनाडूला पोहोचले आहेत. यावेळी ते म्हणाले की, देशाच्या दक्षिणेकडील कन्याकुमारी येथून आज जी लाट निर्माण झाली आहे ती खूप पुढे जाणार आहे.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “देशाच्या दक्षिणेकडील कन्याकुमारी येथून जी लाट उठली आहे ती आज खूप दूर जाणार आहे. मी 1991 मध्ये कन्याकुमारी ते काश्मीर एकता यात्रा घेऊन गेलो होतो, यावेळी मी काश्मीरमधून कन्याकुमारीला आलो आहे. जम्मू – काश्मीरच्या जनतेने देश तोडण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना नाकारले आहे. आता तामिळनाडूची जनताही तेच करणार आहे.तमिळनाडूच्या भूमीवर मोठा बदल मला दिसत आहे. तसेच यावेळी तामिळनाडूमध्ये भाजपची कामगिरी डीएमके आणि काँग्रेसच्या इंडिया आघाडीचा अभिमान नष्ट करेल.
विरोधकांवर निशाणा साधत पीएम मोदी म्हणाले की, “आम्ही ऑप्टिकल फायबर आणि 5जी दिले, डिजिटल इंडिया योजना आमच्या नावावर आहे. पण इंडिया अलायन्सच्या नावावर लाखो कोटींचा 2जी घोटाळा आहे आणि त्यात डीएमके सर्वात मोठा भागधारक होता.आमच्या नावावर उडान योजना आहे, इंडिया आघाडीच्या नावावर हेलिकॉप्टर घोटाळा आहे. आमच्या खेलो इंडिया आणि टॉप्स योजनांमुळे देशाला क्रीडा क्षेत्रात उच्च उंची गाठण्यात मदत झाली आहे, परंतु त्यांच्या नावावर CWG घोटाळ्याचा डाग आहे”
“इंडिया आघाडी कधीच तामिळनाडूचा विकास करू शकत नाही. या लोकांचा इतिहास घोटाळ्यांचा आहे. जनतेला लुटण्यासाठी सत्तेवर येणे हाच त्यांच्या राजकारणाचा आधार आहे. एकीकडे भाजपच्या कल्याणकारी योजना आहेत, तर दुसरीकडे करोडो रुपयांचे घोटाळे आहेत”, अशी टीकाही पंतप्रधान मोदींनी केली.